Friday , March 6 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

Spread the love

 

बेळगाव : 1 जून 1986 साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्माना अभिवादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 27 रोजी दुपारी ठीक 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. या अभिवादन कार्यक्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे विचार ऐकण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सचिव ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *