
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रारंभोत्सव झाला. बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीत प्रवेश कार्यक्रम पडला. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सहाय्यक शिक्षिका नम्रता पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. जोरदार टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या बालवाडी शिक्षिकांसोबत वर्गशिक्षिकांचेही करण्यात आले. मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. रबर व प्लास्टिक यांचा वापर टाळून कागदवृष्टी करण्यात आले. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. शाळेमध्ये स्कॉलर बॅचमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळाही यावेळी पार पडला.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, सहाय्यक शिक्षिका दिप्ती कुलकर्णी, कमल हलगेकर, जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta