
बेळगाव : मागील आठ दहा दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने राजहंसगड परिसरात पेरणी हंगामाला सुरुवात झाली आहे. भात तसेच भुईमूग शेंगा व सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे..
वळीवाने दडी मारल्याने येथील शेकऱ्यांना पुरेशी मशागत करता आली नाही, अशातच मागील आठवडा भरापासून सतत सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली होती, मात्र दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणी हंगामाला सुरवात झाली असून शेतकऱ्याना थोडासा दिलासा मिळाला आहे..
सध्या भात पेरणी, भुईमूग शेंगा, सोयाबीन पेरणी तसेच रताळी लागवडिसाठी म्हेरा तयार करण्याचे काम सुरू आहे..
अवकाळी पाऊसाचा फटका….
राजहंसगड परिसराला यंदा पावसाने चांगलाच फटका दिला आहे, अवकाळी पावसाने दगा दिला व शेतीची मशागतीची कामे थांबली आणि आता संततधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे यंदा शिवार तयार करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta