
कित्तूर : कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्गावर टँकरने धडक दिल्याने तीन कामगार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. रामचंद्र, महेश आणि रामण्णा अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
सर्व कामगार राष्ट्रीय महामार्गावर काम करत होते. यामधील भीमाबाई, लक्ष्मीबाई आणि अनुश्री या तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वाहन महामार्गावरून सर्व्हिस रोडवर उलटून गंभीर जखमी झालेल्या टँकर चालकाला बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. सर्व मृत कलबुर्गी जिल्ह्यातील असल्याचे वृत्त आहे.
Belgaum Varta Belgaum Varta