
बेळगाव : जैतनमाळ खादरवाडी परिसरातील एका शेतात विजेच्या धक्क्याने येळ्ळूर गावातील एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी घडली. राहुल पाटील (वय ३२) रा. येळ्ळूर असे त्यांचे नाव आहे.
आज सकाळी साधारण ८ च्या सुमारास खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे रीडिंग घेत असताना विजेच्या जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
राहुल पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचे बारसे साजरे केले होते. राहुल हे मेहनती आणि जबाबदार व्यक्ती होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावभर शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta