
बेळगाव : वटपौर्णिमा अर्थात सुवासिनींनी वडाला पुजण्याचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने स्वतःचा पती सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडून परत आणले. अशी आख्यायिका आपल्या हिंदू धर्मात सांगितली जाते. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशातील लाखो स्त्रिया आजच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करतात. वडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे अशी त्या वडाकडे प्रार्थना करतात. आजकाल सिमेंटच्या जंगलामध्ये वडाचे झाड मिळणं कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे आजची सावित्री ही चूल आणि मूल पुरती मर्यादित नसून ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते अशा स्त्रियांना वड पुजण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी देखील मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे सकाळी कुंडीत वडाची फांदी लावून त्याचेच पूजन करून वटसावित्रीची पूजा स्त्रिया करतात. वडाच्या झाडाची पूजा करण्याचे आरोग्यपूर्ण व वैज्ञानिक कारण देखील दिलं जातं. आजच्या या वटपौर्णिमेच्या दिनाचे औचित्य साधून अन्नपूर्णेश्वर नगर येथील सान्सी महिला मंडळाच्या महिलांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलामध्ये या महिलांनी आज वटवृक्षाचे रोपण करून त्या वटवृक्षाची पूजा देखील केली व जन्मोजन्मी हाच नवरा आपल्याला मिळवा, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत या वटवृक्षाचे संवर्धन करण्याचा संकल्प देखील सान्सी महिला मंडळाच्या महिलांनी केला.
यावेळी महिला मंडळाचे अध्यक्ष सविता लोकूळकर, प्रीती पाटील, शिल्पा पाटील, वैशाली पाटील, उमा घोरपडे, रूपा अरुंदेकर आदी महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta