
बेळगाव : ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बसवन कुडची (ता. बेळगाव) येथे घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सदर म्हैस जिन्नप्पा वंडरोटी (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची) यांच्या मालकीची होती.
जिनाप्पा वंडरोटी यांच्याकडे एकूण सहा म्हशी असून, दररोजच्या सवयीप्रमाणे ते आपल्या म्हशींना चराईसाठी देवराज अर्स कॉलनीकडे नेत असतात. परंतु, घराजवळून थोड्याच अंतरावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांच्या म्हशीला विजेचा धक्का लागला. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हेस्कॉमने त्वरित द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta