Tuesday , March 3 2026
Breaking News

‘गोष्ट इथे संपत नाही’ कार्यक्रमाला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Spread the love

 

 

बेळगाव : महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातील अतुल्य आणि अद्भुत शौर्यगाथा असलेल्या अफजल खान लढाईचा पट सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी रविवारी उलगडला. यामुळे चिंतामणराव ज्युबिली हॉलमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार होता आले. अनेकांनी ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाची मुक्तपणे प्रशंसा केली.
‘सकाळ’तर्फे आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे रविवारी मिरापूर गल्ली, शहापूर येथील चिंतामणराव ज्युबिली हॉलमध्ये ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते शिवपूजन पार पडले.. ‘सकाळ’चे मुख्य व्यवस्थापक उदय होनगेकर यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’तर्फे नेहमीच विविध उपक्रम आयोजित करण्यावर भर दिला जात असून ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास शहरातील शिवप्रेमींसमोर मांडला जाणार आहे.

आमदार अभय पाटील म्हणाले, “शहरात ‘गोष्ट इथे संपत नाही’ अशा कार्यक्रमांचे सादरीकरण होण्याची गरज आहे. चिंतामणराव शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे ऑडिटोरियम निर्माण केल्यामुळे येथे येणाऱ्या काळात मराठी नाटकांचे सादरीकरण करण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या आर. एम. चौगुले असोसिएटसचे आर. एम. चौगुले, अमर कन्स्ट्रक्शनचे अमर अकनोजी, प्रसाद फार्मसीचे प्रसाद घाडी, श्याम टाईल्सच्या सुरभी, विशाल मुरकुंबी तसेच महापौर मंगेश पवार, नगरसेवक गिरीश धोंगडी व सारंग मांडके व सारंग भोईरकर यांचा ‘सकाळ’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. रोशनी हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले. वृषांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी ‘गोष्ट इथे संपत नाही’ या संपूर्ण शिवचरित्राचे आठ प्रयोग लवकरच बेळगावात आयोजित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *