
बेळगाव : प्रोत्साह फौंडेशनच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या बैठकीत रविवार दि. 10 एप्रिल 2022 रोजी चर्मकार समाज वधू-वर आणि पालक परिचय मेळावा बेळगाव येथे करण्याचे सर्वानुमते ठराविण्यात आले आहे.
सदर बैठकीत सागर कित्तुर यांनी मागील जमा खर्च मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीला फौंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी, सदाशिव कट्टीमनी, भीमराव पवार, चंद्रकांत लोकरे, सुरेश सांगली, सागर कित्तुर, मल्लिकार्जुन तालिकोटी, सागर कोलेकर, शिवराज सौदागर, हिरालाल चव्हाण, रवी होंगल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
संतोष होंगल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta