Friday , March 6 2026
Breaking News

बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू…

Spread the love

 

बेळगाव : आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली. बेळगाव मधील शुभम पावले (वय 27) या भाविकाचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावमधील काही मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले असता आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास सर्व मित्र चंद्रभागा नदीत, पुंडलिक मंदिराजवळ आंघोळीसाठी गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याचे समजले. त्यापैकी तिघे सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. पण शुभम हा वाहून गेला. प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने केलेल्या चार तासांच्या शोधमोहीमेनंतर शुभमचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *