
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची शहराच्या बाहेरील सागरनगरमध्ये किरकोळ भांडणानंतर एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
याबाबत मिळालेली माहिती, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून यासीन जाटगार (२२) नामक युवकाचा आरोपी रोहित जाधव याने चाकूने भोसकून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी रोहित जाधव याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण झाला. बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta