
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि अंगणवाड्यांना उद्या पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारी 25 जून रोजी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या गुरूवार दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD), बंगळुरूने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याने बेळगाव, खानापूर आणि कित्तूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने, प्रशासनाने आज बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यात एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाणा कमी होण्याऐवजी वाढत असल्याने, उद्या गुरुवार दिनांक 26 जून रोजी सुद्धा प्रशासनाने शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta