
बेळगाव : जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक केली. अंदरबाहर खेळत असल्याची माहिती मिळाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नंदीहळ्ळी गाव हद्दीतील वाकडेवड रोडवरील रवी टोपकर यांच्या शेतात छापा टाकला आणि १२ आरोपींना अटक करण्यात आली.
गोविंद परशुराम चौगुले, सूरज मस्नु टोपकर, मारुती पांडू सुतार, भरत सुधाकर पाटील, शिवाजी पांडू सुतार, संतोष अशोक सुतार, यल्लाप्पा परशुराम राघोजी, ज्योतिबा मोनाप्पा टोपकर, सातेरी परशुराम सुतार, किरण लक्ष्मण तळवार, सुता किरण, परशुराम पांडू सुतार, कल्लाप्पा नागेंद्र टोपकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्यांकडून रु. 15,090 रुपयांची रोकड आणि अंदरबाहर पाने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta