Wednesday , March 4 2026
Breaking News

इंगळगी मारहाणी प्रकरणी चार जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, काल हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्या घटनेतील पीडितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आम्ही स्वेच्छेने तक्रार नोंदवली आहे, असे ते म्हणाले.
२६ तारखेला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध गो तस्करी करणारे एक वाहन थांबवले होते. वाहनात पाच गायी होत्या. श्रीराम सेनेचे कार्यकर्त्यांनी वाहनासहीत पोलिस स्टेशन गाठले. यावेळी दोघांनी एकमेकांवर कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी लिहून दिले. नंतर, त्यांनी त्याच दिवशी गायींना गोशाळेत पाठवले होते. २८ तारखेला, जेव्हा मालक गाय आणण्यासाठी गोशाळेत गेला तेव्हा श्रीराम सेनेचे कार्यकर्ते त्याच्या मागे लागले आणि गाडीचे मालक बाबूसाब यांच्या घरात घुसले. घरात मुली असताना श्रीराम सेनेचे कार्यकर्ते घरात घुसले. त्यामुळे महिलांनी आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी सर्वांना झाडाला बांधून मारहाण केली.
या प्रकारामुळे पोलिस प्रशासन अस्वस्थ झाले आणि हा एक भयानक प्रकार असल्याने आम्ही एफआयआर नोंदवला. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणी आम्ही चार आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणी एक हिंदू आणि तीन मुस्लिमांना अटक केली आहे.

हा वाद हिंदू- मुस्लिम नसून अन्य समाजातील सर्वांनी मिळून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला आहे. याप्रकरणी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते महावीर सोलापुरे आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच शिवपुत्र सनदी नावाच्या चालकाविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

श्रीराम सेनेच्या संबंधित 5 कार्यकर्त्यांपैकी एक असलेला महावीर सोलापूर हा रावडी शिटर असून कायदेशीररित्या त्याला बेळगाव जिल्ह्यातून कलबुर्गी जिल्ह्यात तडीपार करण्यात आले आहे. तसेच त्याबाबतची माहिती कलबुर्गी पोलिसांना देण्यात आली आहे ही वस्तुस्थिती असताना कायद्याचे उल्लंघन करून संबंधित तडीपार रावडी शिटरचे पुन्हा बेळगाव जिल्ह्यात आला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *