
बेळगाव : बेळगाव शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजण्यापलीकडे आहे. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत बेळगावचे वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक श्री. महांतेश मठपती यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. महांतेश मठपती यांनी केलेले कार्य समाजाप्रती असलेली जबाबदारी दर्शवणारीच ठरली आहे. रस्ता दुरुस्ती करणे हे काम जरी बांधकाम विभागाचे असले तरी बेळगाव शहराच्या वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षकांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक मठपती यांच्याप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्यांनी तसेच जबाबदार नागरिकांनी असा पुढाकार घेतला तर आपले शहर निश्चित सुरक्षित व खड्डेमुक्त बनेल यात शंका नाही.

Belgaum Varta Belgaum Varta