
बेळगाव : रोटरी इ क्लबचा वसंतराव पोतदार पॉलीटेकनिक येथील सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. कविता कणगणी यांची 2025-26 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. वेंकटेश देशपांडे, माजी अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक, माजी सचिव रो. सागर वाघमारे, नवनिर्वाचित अध्यक्षा रो. कविता कणगणी, सचिव रो. शिल्पा खडकभावी, गव्हर्नर चे सहाय्यक रो. राजेशकुमार तळेगाव उपस्थित होते.
यावेळी माजी सचिव सागर वाघमारे यांनी वर्षभरात केलेल्या प्रकलपांचे सादरीकरण केले. माजी अध्यक्षा लक्ष्मी मुतालिक यांनी 2 गरीब मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. त्यानंतर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. वेंकटेश देशपांडे यांच्या हस्ते रो. कविता कणगणी यांना अध्यक्ष पदाचा भार सोपविण्यात आला. रो. कविता कणगणी यांनी आपल्या नवीन बोर्ड सदस्यांची नावे जाहीर केली.
पीडिजी रो. व्यंकटेश देशपांडे यांनी प्रेरणादायी भाषण केले, रोटरीची मूलभूत मूल्ये, विश्वासाचे महत्त्व आणि रोटेरियन्सना जोडणारे ऋणानुबंध यावर प्रकाश टाकला. त्यांनी येणाऱ्या अध्यक्षांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि भविष्यातील नेतृत्वासाठी अंतर्दृष्टीपूर्ण सल्ला दिला.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. लता कित्तूर व प्रतीक्षा चाफळकर यांनी केले. रो. सागर वाघमारे याच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी रोटरी इ क्लबचे व बेळगावातील इतर रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta