
संजीविनी फौंडेशनच्या वतीने सेवाभावी डॉक्टरांचा सन्मान
बेळगाव : डॉक्टरी व्यवसायासोबत सेवाभाव महत्वाचा असून आज अशाच सेवाभावी डॉक्टरांना आम्ही सन्मानित करत असल्याचे मत संजीविनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी मांडले.
प्रदीर्घकाळ रुग्ण आणि समाजसेवा केलेल्या डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या प्रास्ताविक करताना बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
त्यानंतर डॉ. मंजूषा गीजरे, डॉ. सविता कदु, डॉ. उज्वल हलगेकर आणि डॉ. राजश्री नेसरीकर या चार सेवाभावी डॉक्टरांचा संस्थेच्या संचालिका रेखा बामणे, सल्लागार डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नविना शेट्टीगार यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
सन्माननीय डॉक्टरांचा परिचय अर्चना शिरहट्टी यांनी करून दिला.
उपस्थित सत्कारमूर्तीनी सत्काराला उत्तर देताना संस्थेप्रति कृतार्थता व्यक्त करून आपली जबाबदारी वाढली असून समाजासाठी गोरगरीब रुग्णांसाठी जे जे उत्तम करता येईल ते आम्ही नक्की करू असे आश्वासन दिले.
शेवटी सावित्री माळी यांनी आभार मानले तर पद्मा औशेकर यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम आदर्श नगर येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.
यावेळी काळजी केंद्रातील सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta