
बेळगाव : बेळगाव शहराच्या कोल्हापूर सर्कलजवळील एका जीर्ण इमारतीत गुरुवारी एका भिक्षुकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
सदर भिक्षुकाचा मृत्यू गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. उत्तरीय तपासणी आणि पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta