
बेळगाव : बेळगाव जिल्हा अल्पसंख्यांक विभागाने गुरुवारी कर्नाटकमधील अल्पसंख्यांक विकास महामंडळ (KMDC) तर्फे नियुक्त झालेल्या जिल्हा अल्पसंख्यांक समितीच्या नव्याने नामनिर्दिष्ट सदस्यांचा सत्कार केला. कर्नाटकमधील सरकारने मागील महिन्यात जिल्हास्तरीय सहा सदस्यांची समिती नियुक्त केली होती. सदर समिती विविध अल्पसंख्यांक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी विजय प्रकाश पुजार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचा व विविध अल्पसंख्यांक समाजांकडून आलेल्या विविध प्रस्तावांची समीक्षा करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यातील जैन बसदी, चर्चेस, शादीमहल, गुरुद्वारा, रोजगार कर्ज योजना, शिष्यवृत्त्या यांच्चाही परामर्श घेण्यात आला. प्रधानमंत्री अल्पसंख्यांक कल्याणासाठीच्या १५ पॉइंट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बेळगावचे नियाज सौदागर, लुईस रॉड्रिग्ज, विनोद दोड्ड्ण्णावर, शाहीद मेमन, परमिंदर भाटिया आणि किल्लेदार यांची समिती नामनिर्दिष्ट केली आहे.
केंद्र सरकार अल्पसंख्यांकांना शिक्षण, उद्यमशीलता, रोजगार, शिष्यवृत्त्या, निवासस्थान, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासारख्या विविध क्षेत्रांत समान संधी देण्यासाठी १५ ठोस गोष्टी निर्धारित करते. या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या फायदे अल्पसंख्यांक समुदायांपर्यंत प्रभावीपणे आणि भेदभावाशिवाय पोहचवले जातात, याचीही खात्री केली जाते.
अल्पसंख्यांक कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची महत्त्वाची जबाबदारी समितीवर आहे. नव्याने नामनिर्दिष्ट केलेल्या समिती सदस्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची व सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करण्याची शपथ घेतली. जिल्हा अल्पसंख्यांक समिती सरकार आणि जनतेमधील मुख्य दुवा म्हणून कार्य करेल, ज्याची जबाबदारी विकास योजना अंमलात आणताना पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याची असेल.

Belgaum Varta Belgaum Varta