Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यावतीने चार्टर्ड अकाउंटन्ट श्री. तुकेश पाटील यांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे युवा सी.ए. श्री. तुकेश पाटील यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या वतीने सी.ए. दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
वाणिज्य क्षेत्रात, व्यवसाय आणि उद्योग धंद्यामध्ये प्रगती साधताना सर्व सी. ए. मंडळींचे कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे, असे अध्यक्ष सचिन केळवेकर म्हणाले.
यावेळी सी.ए. तुकेश पाटील यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भेट देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी शिंदे, फेडरेशन सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी, सदस्य एम गंगाधर, प्रशांत सुगंधी, अभिषेक वाईगडे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *