Wednesday , March 4 2026
Breaking News

बिजगर्णीत घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love

बेळगाव : बेळगाव तालुक्यात संततधार सुरूच असून आज सोमवार दि. 7 रोजी सकाळी 7 वाजता बिजगर्णी, कलमेश्वर गल्ली येथील वसंत कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव तालुका परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रविवारी रात्री मुसळधार पाऊस बरसत होता. यामध्ये या घराची २५ फुट लांबीची विटा-मातीची भिंत कोसळली. मात्र, या कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. उर्वरीत भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी या गरीब कुटुंबीयाने केली आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *