Monday , September 21 2026
Breaking News

न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जीवघेणा हल्ला!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये आणखी एक घृणास्पद घटना घडली आहे. न्यायालयाच्या आवारातच गुन्हेगारांनी वकिलावर जीवघेणा हल्ला केला आणि पळून गेले.

वकिल जहीर अब्बास हुक्केरी हे केस संपवून बाहेर पडत असताना त्यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच दगड आणि रॉडने हल्ला केला. गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून न्यायालय आवारात त्यांच्या पालकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी सोयल इनामदार याच्यासोबत असलेल्यांनी ऍड. जहीर अब्बास हुक्केरी याच्यावर दगड, विटांनी हल्ला केला. सदर

ऍड. जहीर यांच्या डोक्याला, कानाला, नाकाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *