Friday , March 6 2026
Breaking News

विजेचा धक्का बसून हेस्कॉम कर्मचाराचा मृत्यू; तब्बल तीन तास मृतदेह लटकतच!

Spread the love

 

यरगट्टी : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला पण खेदाची बाब म्हणजे तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लटकत असलेल्या मृतदेहाजवळ कोणीही फिरकले नाहीत. ही धक्कादायक घटना यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ गावात घडली.

बगरनाळ गावातील मारुती आवळी (२५) हा हेस्कॉम कर्मचारी मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर चढून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करत असताना त्याला विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तब्बल तीन तासाहून अधिक वेळ मृतदेह तसाच लटकत असलेला होता. तरीही हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी मृतदेहाजवळ आले नाहीत. या निष्काळजीपणामुळे मुगळीहाळ ग्रामस्थ हेस्कॉम अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *