
बेळगाव : बडेकोळमठ परिसरात वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, डीसीपी (गुन्हे) आणि संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर ८७ जण जखमी झाले आहेत. वाहनचालकांशी संवाद साधताना, अनेकांनी या भागात ब्रेक निकामी झाल्यासारखे अनुभव सांगितले आहेत.
अपघात नियंत्रणात आणण्यासाठी, कालच घटनास्थळी काही तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, दीर्घकाळ टिकणाऱ्या समाधानासाठी रस्त्याच्या व्यापक सुधारणेची नितांत गरज आहे, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. प्राधिकरणाने रस्त्याच्या सुधारणा कामाची जबाबदारी स्वीकारली असून, ते लवकरच काम सुरू करणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याचे काम पूर्ण करत नाही, तोपर्यंत वाहनचालकांनी या धोकादायक ठिकाणी अत्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta