
बेळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मिडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शहापूर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चाळके, सामाजिक कार्यकर्ते विल्सन वेगस, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास हुद्दार, प्रोत्साह फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष होंगल, हिरालाल चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 40 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने संतोष दरेकर यांचा शाल,पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले. उपेंद्र बाजीगर यांनी प्रास्ताविक केले. हिरालाल चव्हाण यांनी आभार मानले. अमृत बिर्जे, रोहन पाटील, शेखर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta