Thursday , March 5 2026
Breaking News

युवा समिती बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

 

बेळगाव : आज शनिवार दि. 12/07/2025 रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता 1 लीच्या सर्व तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष श्री. सागर क. सावगावकर तसेच समितीचे कार्यकर्ते श्री. राजू कदम, दर्शन घाटेगस्ती, गजानन घाटेगस्ती, केदारी घुग्रेटकर, उत्तम कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. आर. डी. पाटील तसेच शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय गौंडाडकर यांनी केले तर आभार श्री. आर. डी. पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *