
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्याकडून 12जुलै रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, संघटनेची स्थापना झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यातील विविध मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहोत. यामागे एकच उद्देश आहे की मराठी भाषा टिकावी अन मराठी शाळा टिकल्या तरच सीमाभागात मराठी भाषा व संस्कृती टिकेल. ज्या पालकांनी आपल्या मुलांना सरकारी मराठी शाळेत पाठवले त्या मुलांचे व पालकांचे कौतुक म्हणून आम्ही युवा समितीतर्फे छोटीशी शैक्षणिक मदत करीत आहोत. यासाठी अनेक मराठी दानशूर व्यक्ती मदत करत असतात.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, चिटणीस गुंडू कदम, युवा समितीचे कार्यकर्ते किरण मोदगेकर, कल्लाप्पा मोदगेकर, किरण शिंदोळकर, पिराजी मोदगेकर, आप्पाजी लोहार, तेजा गाडेकर, मुख्याध्यापक पी. के. घोलप, ज्येष्ठ शिक्षिका भरती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैजनाथ रामराव यांनी केले तर प्रास्ताविक युवा कार्यकर्ते रोहित गोमनाचे यांनी केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta