
रायबाग : फक्त पाच हजार रुपयांसाठी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रायबाग तालुक्यातील बुधिहाळ गावात घडली. मारुती लट्टी (२२) असे खून झालेला तरुण गायकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत तरुण मारुती लट्टी हा बुधिहाळ गावातील मारुती हा तरुण अलिकडेच उत्तर कर्नाटक शैलीत लोकगीते गात होता आणि त्याने युट्यूबवरही लक्ष वेधले होते. याने काही दिवसांपूर्वी इरप्पा अक्किवटेकडून ५० हजार रुपयांचे कामावर येण्यासाठी कर्ज घेतले होते. कामावर येऊ न शकल्याने त्याने ४५ हजारांचे पैसे परत केले होते. उर्वरित पाच हजार रुपये न दिल्यामुळे इरप्पाने एक टोळी तयार केली आणि मारुतीची निर्घृण हत्या केली.
याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिद्धराम वडेयार आणि आकाश पुजारी यांना ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta