Sunday , July 26 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण…

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने एसकेई सोसायटीच्या एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला शाळेच्या वतीने युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निपाणी तालुका समिती अध्यक्ष अजित पाटील यांनी मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी मराठी शाळा या जपल्या पाहिजेत आणि सीमाभागांमध्ये त्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. खणगावकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, पदाधिकारी सुरज कुडूचकर, निपाणी युवा समितीचे सदस्य अमोल पाटील, अनिकेत नाईक, ओमकार नाईक, ओमकार खोत, क्रीडाशिक्षक आर. बी. परीट, सहशिक्षिका मेघना मांडेकर आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहशिक्षक तानाजी पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *