
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————–
——————————————————————–
बेळगाव : सीमाभागात कर्नाटक सरकारने लादलेल्या कन्नडसक्ती विरोधात काल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध नोंदवला आणि येत्या काळात कन्नडसक्ती विरोधात आंदोलन हाती घेण्यासंदर्भात चर्चा केली. या आंदोलनाचा काही मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी धसका घेऊन समितीला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
काल समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांची भेट घेतली आणि कन्नड भाषेची सक्ती रद्द करण्याची मागणी केली. त्याबरोबर काल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीतही कन्नडसक्तीला विरोध करण्यासाठी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यामुळे कन्नड संंघटना बिथरल्या असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, समितीच्या प्रमुखांना आवर घाला, कन्नड विरोधी विचारसरणीचे पालन करणाऱ्यावर देशद्रोही गुन्हा नोंदवा, अशा हास्यास्पद मागण्या केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी देवेंद्र तळवार, संतोष तळ्ळीमणी, मारुती दोड्डा लक्कप्पागोळ, भरमन्ना कांबळे, वासू बसनयकर, सिद्राय नायक आणि इतर यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta