
बेळगाव : बेळगाव शहराचे लोकप्रिय पोलिस अधिकारी एन. बी. बरमनी यांची बेळगाव शहराच्या डीसीपी पदी बढती झाल्याबद्दल बेळगाव शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध वित्त संस्था, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बरमनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित डीसीपी एन. बी. बरमनी म्हणाले की, मी माझ्या पोलिस खात्यातील नोकरीचा बराच काळ बेळगाव शहरात कार्यरत आहे. बेळगाव शहराचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. यापूर्वी देखील मी बेळगावमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे यापुढे देखील मी बेळगाव शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील असेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बेळगावकरांच्या वतीने प्रदीप अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, मोहन बेळगुंदकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर संजय शिंदे, माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, माजी नगरसेवक नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, संजय सातेरी, शरद पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, दयानंद कदम, प्रशांत भातकांडे, अमोल देसाई आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta