
बेळगाव : श्रावण महिना सुरू होताच, सणांची मालिका येते. विशेषतः बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज रविवार दि. २० रोजी आमदार आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागात फेरफटका मारून कामाची पाहणी केली.
गणेशोत्सव जवळ येत असल्याने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी फोर्ट रोडवरील विकास कामाची पाहणी केली.
उत्सवाच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी कामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. उत्सवाच्या काळात नागरिक आणि भाविकांसाठी सुरक्षित, स्वच्छ रस्ते असावेत असे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त शुभा, युवा नेते अमन सेठ, स्थानिक नेते आणि नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta