Thursday , March 5 2026
Breaking News

बस स्टँड परिसरात चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सेंट्रल बस स्टँड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगाव सेंट्रल बस स्टँडवर गर्दीच्या ठिकाणी बसमधून उतरताना सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी पुंडलिक भीमप्पा लेनकन्नावर यांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश विजय जाधव आणि कालिदास दिलीप बराडे यांना अटक केली आहे.

या प्रकरणांमध्ये एकूण ९,३१,००० रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे आणि दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *