Friday , March 6 2026
Breaking News

सौंदत्ती तालुक्यातील मळगली येथे विहिरीत पडून वडील, मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मळगली गावात रविवारी विहिरीत बुडून वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसवराज केंगेरी (४०) आणि मुलगा धरेप्पा केंगेरी (१४) अशी मृतांची नावे आहेत. बसवराज केंगेरी हे सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावचे रहिवासी आहेत. पत्नीच्या गावात आपल्या जमिनीवर कीटकनाशके फवारण्यासाठी शेतात गेले होते. बसवराज हे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले असता पाय घसरून विहिरीत पडले. बसवराज केंगेरी यांना वाचवण्यासाठी त्यांचा एक मुलगा धारेप्पा आणि दुसरा बगप्पा सन्नक्की यांनी तातडीने विहिरीत उडी मारली. यावेळी बसवराज आणि धारेप्पा दोघेही बुडाले. शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांनी बागप्पाला वाचवले. गंभीर स्थितीत असलेल्या बागप्पा या मुलावर बैलहोंगल सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *