
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची गोकाक येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली आणि व सीमाभागात होत असलेल्या कन्नडसक्तीला आपण बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नडसक्ती त्वरित मागे घावी असे निवेदन सादर केले. त्यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावर कन्नडसक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून या आदेशातून विवादित सीमाभागाला वगळून अंमलबजावणी करावी अशी विनंती केली.
जर कदाचित ही कन्नड सक्ती अशीच चालू राहिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचे पडसाद दोन्ही राज्यात उमटतील अशी माहिती दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी आपण यांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊन मराठी भाषिकांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजित मजुकर, अशोक घगवे, नारायण मुंचडीकर,भागोजीराव पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनिल किरळे, रंजित हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर, सचिन दळवी, गजानना शहापूरकर, सुरज कणबरकर, प्रविण गौडर, सुरज जाधव गणेश मोहिते, निलेश काकतकर, श्रीकांत नादूंरकर, राजू नागेश पावले, दिपक लोहार, अनिल देसूरकर, शुभम जाधव, विनायक कांगले, दिपक गुळेनव्वर, अमोल चौगुले, रोहित वायचळ, विशाल सावंत, अभिषेक कारेकर, किरण नार्वेकर, आनंद तुप्पट, अभिषेक तुप्पट, अक्षय पाटील, नागेश सराफ, ज्ञानेश्वर चिकोर्डे, तब्रेज मस्केवाले, राहूल देसूरकर, पवन खाडे, शेखर कोडेकर, चेतन अजरेकर, दिगंबर खांबले, बसवंत गावडोजी, अनिल घडशी प्रशांत बैलूरकर प्रविण पाटील, यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta