
बेळगाव : कौटुंबिक वादामुळे घटस्फोटासाठी एक जोडपे न्यायालयात आले होते, परंतु पतीने न्यायालयात आवारातच पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला.
ही घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात घडली. सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावातील ऐश्वर्या गणाचारी हिच्यावर बैलहोंगल तालुक्यातील सवंतगी गावातील मुथप्पा गणाचारी याने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी महिलेवर सौंदत्ती सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना सौंदत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Belgaum Varta Belgaum Varta