बेळगाव : बेळगावमधील मंडोळी रोडवर बांधकाम व्यावसायिक राजू दोड्डबोमन्नवर यांच्या हत्या प्रकरणाची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज दिली.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आपल्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मंडोळी रोडवर बेळगाव शहराच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना घडली. तातडीने आमच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. मयत व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाल्याचे आढळून आले. ते म्हणाले की, मृत राजूच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून ते बेळगाव आणि इतरत्र रिअल इस्टेट आणि अपार्टमेंटच्या बांधकामाचे काम करत होते. ही घटना कशी घडली आहे याची अनेक प्रकारे माहिती आम्ही गोळा करत आहोत. आमचे अधिकारी तपास करत आहेत. व्यक्तिमत्व आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे प्रकरण घडले आहे की दुसरी कोणती बाजू आहे यासह आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. ते म्हणाले की, आम्ही लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊ आणि आरोपी गजाआड असतील.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …