खानापूर : खानापूर–बेळगाव मार्गावर प्रभुनगर गावाजवळ दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघात होऊन डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. सुरभ द्रौपदकर (२८) असे जवानाचे नाव आहे.
अपघात इतका भयानक होता की जवान रस्त्यावर दूर फेकला गेला. अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर केए 22 एचके 8494 असून ती यामाहा एफझेड कंपनीची आहे. घटना घडताच ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, पोलिसांनी अपघाताच्या तपासास सुरुवात केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta