Thursday , March 5 2026
Breaking News

मणगुत्ती शिवमूर्ती प्रकरणात सुनावणी पुढे ढकलली

Spread the love

 

बेळगाव : मणगुत्ती ता.हुक्केरी येथे शिवपुतळा उभारणी करण्यासाठी शिवप्रेमींनी आवाज उठवला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती, शिवप्रेमींचा उद्रेक होऊन पोलिसांनी त्यांना चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांचेवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची सुनावणी संकेश्वर सत्र न्यायालयात सुरू असून आज दिनांक 31 जुलै रोजी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली, याची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.

आज सुनावणी दरम्यान दिनेश कदम,युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके हजर होते. वकील महेश बिर्जे व वकील रिचमन रिकी काम पाहात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *