
बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान पंचकमिटी मार्फत चालविण्यात यावे असे सर्वानुमते ठरले असताना येथील एका राजकीय वरदहस्त लाभलेल्या गृहस्थाने सदर रेशन दुकान आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करून घेतल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.
राजहंसगड येथील रेशन दुकान हे गावपंचांच्या नावाने होते. मात्र एका व्यक्तीने सदर दुकान गुपचूप आपल्या कुटुंबियांच्या नावाने करून घेतले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली व त्या दुकानदाराच्या विरोधात मंगळवारी रात्री श्रीसिद्धेश्वर मंदिरामध्ये गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी संबंधित व्यक्तीचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेता रेशन दुकान स्वतःच्या नावे करून घेतल्याबद्दल त्या व्यक्तीला 1 लाख रु. दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी ग्राम पंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्ट, तसेच गावातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta