
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी त्यांच्या कर्नाटक दौऱ्या दरम्यान तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या बेंगळुरू – बेळगाव ट्रेनला देखील हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. ज्यामुळे बेळगावच्या नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री श्री. जगदीश शेट्टर यांनी दिली आहे.
येत्या रविवारपासून सुरू होणारी वंदे भारत ट्रेन बेळगावहून सकाळी ०५:२० वाजता निघेल आणि दुपारी ०१:५० वाजता बेंगळुरूला पोहोचेल. त्यानंतर ती ट्रेन बेंगळुरूहून दुपारी ०२:२० वाजता निघेल आणि रात्री १०:४० वाजता बेळगावला पोहोचेल.
“बेंगळुरू- बेळगाव वंदे भारत ट्रेन सुरू केल्याबद्दल बेळगावच्या जनतेच्या वतीने, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आणि केंद्रीय मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांचे या कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानत आहे, असे खास. शेट्टर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवीले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta