
बेळगाव : बेळगावातील सदाशिव नगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळील घटना घातक शस्त्रांनी महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वड्डरवाडी रामनगर येथील रहिवासी महादेवी करेन (४५) असे दुर्दैवी महिलेचे नाव असून हत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. गेल्या महिन्यापासून सदाशिव नगर येथील एका भाड्याच्या घरात त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी मुलगा गावी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे, डीसीपी नारायण भरमणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह बेळगाव बीम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत..

Belgaum Varta Belgaum Varta