
खानापूर : खानापूर शहरातील समादेवी गल्ली येथील रहिवासी व ज्येष्ठ फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर गुरुसिद्धप्पा सिद्धप्पा हेब्बाळकर (वय 95) यांचे आज बुधवार, दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वार्धक्याने निधन झाले.
गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर, हे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेब्बाळकर यांचे वडील होते. तसेच, सध्या राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ते सासरे होत.
अंत्यविधी आज बुधवार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी 4.00 वाजता खानापूर येथील के.एस.आर.टी.सी. नवीन बसस्थानकाच्या पाठीमागील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta