
बेळगाव : काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये अचानक वाढ झाल्याने वॉटरमॅन वाहून गेल्याची घटना तारीहाळ गावात घडली आहे.
कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मुसळधार पावसामुळे जलाशयातील प्रवाह देखील वाढला आहे. दरम्यान खानापूर तालुक्यातील गाडिकोप्पा येथील ‘वॉटरमॅन’ सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ३४) हे चंदनहोसूर येथे पाइपलाइन दुरुस्त करून तारीहाळ गावात परत येत होते. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते दुचाकीसह पाण्याच्या वेगात वाहून गेले. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta