
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मटका जुगार तसेच अमली पदार्थ विरोधी मोहीम करण्यात आली आहे हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून बुधवारी दोघांना अटक करून त्यांच्याकडील रोख २५०० रुपये रुपये, मोबाईल फोन व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनिल रामा चौगुले (नवी गल्ली, बेळगाव) व प्रकाश कुरंगी (हलगा, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीसीबी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्रि आणि त्यांच्या सहकार्याने सदर कारवाई केली. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात सदर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
गांजा सेवन करणाऱ्या युवकास अटक
सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. ताखिर अफजल नालबंद (वय २०) कलईगार गल्ली बेळगाव असे सदर तरुणाचे नाव आहे. हा तरुण मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी विचित्र वर्तन करत होता ही बाब मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर यांच्या निदर्शनास येताच तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तारिख याने आमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघडकीस आले त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राणघातक शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या युवकास अटक
मार्केट पोलीस स्थानकाच्या अँटी स्टॅबिंग पथकाने एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील प्राणघातक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. जुबेर सय्यद मोकाशी (वय ३०) राहणार कलईगार गल्ली बेळगाव हा तरुण संशयास्पदरित्या वावरत होता. मार्केट पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता चाकू सदृश्य प्राणघातक शस्त्र त्याच्याकडे आढळले मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांच्या सहकार्याने बुधवारी अँटी स्टॅबिंग पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta