Friday , March 6 2026
Breaking News

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतली कन्नडसक्तीसंदर्भातील माहिती!

Spread the love

 

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सुरु असलेल्या कन्नडसक्तीसंदर्भातील परिस्थितीची संपूर्ण माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतली.

आज दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे मुक्कामी आनंदवन आश्रमात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर कन्नड सक्ती संदर्भात सविस्तर माहिती दिली. बेळगावात कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपीबाबत कल्पना दिली असता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तात्काळ तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. चर्चेअंती खासदार धैर्यशील माने यांनी समाज माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राविषयीही आपटेकर यांच्याशी चर्चा केली.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *