बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्या शाळेच्या ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे महत्व ग्रंथपाल प्रमुख पाहुण्या हर्षदा सुंठणकर यांनी व्यक्त केले. आपण रोज पंधरा मिनिटे तरी अवांतर वाचनासाठी दिली पाहिजे असे सुंठणकर यांनी मनोगतात व्यक्त केले. इयत्ता दुसरी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका शामला चलवेटकर यांच्या मार्गदर्शनाने ग्रंथपाल दिनाची भित्तीपत्रके तयार केली.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शाळेच्या शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta