बेळगाव : शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा दिनांक ३० जुलै २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची मूल्ये जपावीत हाच या स्पर्धेचा मूळ उद्देश होता.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, ॲड. राजाभाऊ पाटील,शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, वि.गो.साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, श्वेता सुर्वेकर, स्नेहल पोटे, विज्ञान विषय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या विज्ञान कथाकथन बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी पार पाडण्यात आला. विज्ञान गीत ‘डोळे उघडून पहा गड्यांनो’ हे गीत संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विजेता स्पर्धकांच्या कथा विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आल्या. प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक सृजन अनिल पाटील, द्वितीय क्रमांक आदिती जितेंद्र शिंदे, तृतीय क्रमांक आदिती दिनकर परमोजी, उत्तेजनार्थ श्रीशा बिर्जे, सान्वी मंडोळकर, अवधूत देवळी तर माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक अनुष्का राजीव पाटील, द्वितीय क्रमांक हर्ष गावडू पाटील, तृतीय क्रमांक साईराज राम गुरव, उत्तेजनार्थ क्रमांक हिंदवी गोवेकर, श्रेया कुन्नूरकर, मनस्वी अष्टेकर या विद्यार्थ्यांनी पटकावला. परीक्षक म्हणून शिवराज चव्हाण व बी. बी. शिंदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन विज्ञान शिक्षिका मंजुषा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर तर आभार प्रदर्शन रूपाली हळदणकर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta