बेळगाव : बेळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4-30 वा. वैज्ञानिक दृष्टिकोन, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे राहणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून आय.आर.एस. अधिकारी आकाश शंकर चौगुले हे उपस्थित राहणार आहेत.
हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta