Thursday , March 5 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने आर्ष विद्या आश्रमात गोकुळाष्टमी व रक्षाबंधन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने टिळकवाडीतील आर्ष विद्या आश्रम येथे गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आश्रमात महाराष्ट्र, कर्नाटक तसेच मणिपूर येथील 45 अनाथ मुलींचे योग्य शिक्षण आणि संगोपन केले जाते.

प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून परिषदेच्या उपक्रमांची माहिती करून दिली. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी रक्षा बंधनाचे महत्त्व विशद केले. उमा यलबुर्गी यांनी श्री कृष्णाचा पाळणा गायला. आश्रमातील मुलींनी विविध भक्तिगीते सादर केली. त्यानंतर सदस्यांना राखी बांधून मुलींनी ओवाळणी केली. यानिमित्त भारत विकास परिषदेच्यावतीने आश्रमास आर्थिक साहाय्य करण्यात आले.
प्रिया पाटील, पूजा पाटील आणि तृप्ती देसाई यांनी कार्यक्रम संयोजन केले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन्. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, विनायक घोडेकर, कुमार पाटील, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, पी. जे. घाडी, सुभाष मिराशी, रजनी गुर्जर, जया नायक, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, उमा यलबुर्गी, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, गीता बागेवाडी, शालिनी नायक आदि उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *